Jul 1, 2010

बेधुंद

गेले कित्येक दिवस थोडेफार तरी लिहावे असे स्वतःला सांगतेय..म्हणून आज मुद्दाम वेळ काढला आणि ते सुद्धा मातृभाषेत लिहिण्या करीता (ह्या करीता सुशीलाचे आभार मानेन मी :-). जास्त काही नाही निव्वळ १० मिनिटे झोपण्या पूर्वीची.
तर लिहिण्यास कारण हे कि आज तारीख '१ जुलै, २०१०' (नाही ह्या तारखेची काही खास आठवण अशी नाहीये माझ्या मनात किंवा कल्पनेत). सहा महीने कुठच्या कुठे पळून/उडून गेले कळले सुद्धा नाही. एका अर्थी बरेच झाले म्हणा. ह्याचा अर्थ हा की मी माझे आयुष्य जगण्यात बर्यापैकी तल्लीन झाले होते. २९ डिसेंबर, २००९ रोजी मी माझ्या आयुष्यात जे काही बदल करण्याचे ठरवले होते ते सगळे करण्यात अक्षरशः गुंतून गेले होते.
सगळ्याच गोष्टी मनासारख्या झाल्याच असे नाही म्हणणार पण कोणतीही गोष्ट वाईट, नकारात्मक, मनाला दुख देणारी, हळव करणारी किंवा पश्चाताप करायला लावणारी झाली नाही अर्थात मी होऊ दिली नाही. मैत्री, नोकरी, स्वप्ने, नाती-गोती, परिवार, सामाजिक जबाबदार्या, प्रेम ह्या सगळ्याच बाबतीत चढ-उतार हे नेहमीच येणार आहेत. ह्या सगळ्यांपासून पळून जाणे अशक्य आहे. आज राहून राहून फक्त एकच गोष्ट सतत जाणवतेय कि मी ह्या सगळ्या परिस्तिथीना सामोरे जाण्यासाठी आज समर्थ आहे. मी स्वतःला कधीही दुर्बळ समजले नाही. २००८-२००९ ह्या कालावधीत मी स्वतःबद्दल आणि माझ्या अवतीभवतीच्या लोकांबद्दल भरपूर काही शिकले. हे शिक्षण मला जन्मभर पुरणारे असे आहे. ह्या सगळ्या करीता मी माझ्या आई-वडिलांची आणि लहान बहिणीची सदैव ऋणी राहेन :-)
२ महिन्यांपूर्वी मी जो निर्णय घेतला तो किती चूक किंवा अचूक हे मला माहित नाही. मला फक्त एवढं माहित आहे कि आज मी आनंदी/समाधानी आहे. खर्या अर्थाने स्वातंत्र्य उपभोगत आहे. हा निर्णय निव्वळ एक अट्टाहास नसून कुणाच्याहि दबावाला न घाबरता जगण्यासाठी एकुलता एक पर्याय समजून जगतेय. माझी स्वप्ने मी पूर्ण करू शकेन ह्या विश्वासात जगतेय. आयुष्यात ध्येय, आवाहने लाभली तर जगण्याला वेगळीच नशा आणि धुंदी अनुभवयाला मिळते.
आज मी नशेत आहे आणि जराशी बेधुंद ही :-) :-)

- शुभ रात्री,
कल्याणी

6 comments:

Jason said...

Lovely! I love to read u more in Marathi!

crypticrow said...

thank you much much! this was just a teeny-weeny attempt :) :)

Kudva said...

very well written!!
best of luck as you traverse ur new journey!! stay happy!

sush said...

वा छान सुरुवात केलीस गं...अभिनंदन!!
खूप आनंद झाला वाचून :)
मला नव्हते माहित कि तुला इतके छान मराठी लिहिता येते.. अशीच लिहित रहा.. :)

Kits said...

Oh man, that took me sometime to read- been ages since I read Marathi like that. Having said, I am being v happy that you are being in the 'nasha' state :) Jokes apart, only one thing left to say - Go gurl :D

crypticrow said...

thank you so so so much abhi, sush, kirti..i feel so blessed and encouraged :) :)
@ kirti: haha i am pleasantly surprised you read (albeit after a long gap) and understood my marathi ;) my spoken lingo is hotch-potch! :D thanks again, love :)