चहा जणू काही माझा जीव कि प्राण. सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी हातात हवा तो चहाचा कप. नसला तर जीव अगदी कासावीस होऊन जातो. भले माझी सकाळी उठण्याची वेळ ६, ७, ८, ९, १० असो कि दुपारचे दीड-दोन असो. चहा शिवाय चैन पडणे अशक्यच. कधी कुणी "What's your poison?" असा प्रश्न चुकून जरी विचारला तर माझे उत्तर हमखास चहा असे असायचे. गैरसमज नको. मला चहा प्यायल्यावर चढत वगैरे नाही ;-) किंवा त्याची चटक हि नाही. दिवसाला २ कप हि पुरेसे असतात.
स्वयंपाक घरात सगळ्यात पहिली गोष्ट करायला शिकले तो सुद्धा चहाच. चहाची तर्हा निराळीच. चव हि. आणि सगळ्यांची बनवण्याची व आस्वाद घेण्याची पद्धत हि. साहित्य, कृती, प्रकार, प्रमाण, ठिकाण, लाभ आणि त्याचे रसिक ह्या सगळ्यातच अगणित विविधता. लिहायला बसले तर अख्खा "ब्लोग" च चहा वर समर्पित करावा लागेल :D आणि खर सांगू तर ते काम करायला माझी हरकत हि नाही. वेळ नाहीये हीच एक खंत.
आज हि आजीने केलेल्या मसालेदार चहाची (आणि लज्जतदार जेवणाची) आठवण येते. मन अगदी प्रसन्न होते आणि मग लगेचच भरून हि येते :-)
काही महिन्यांपूर्वी संध्याकाळी मी कसला तरी विचार करत बसले होते. आणि हा फोटो सहज म्हणून काढला. आणि नेहमी प्रमाणे त्यावर "उगीच कोणीतरी" ने मजेशीर कविता रचली. तुम्हाला हि तितकीच रुचकर वाटेल हि आशा :-)
आयुष्याच्या रंगमंचावर
कितीतरी पडदे , कितीतरी रंग ...
काही चहा
सलमान खान च्या हालचालीसारखे
गडबडीने उकळत राहतात,
काही चहा ,
देवगण च्या रागासारखे
कडक लाल टक लाउन
आतल्या आत धुमसत असतात
तर काही चहा
कुणा काजोल वर चालणार्या सिनेमा सारखे
कुणा एका साहेबी चहा पत्ती मध्ये मुरत राहतात ...
काही चहा
इरफान खान सारखे
इंग्रजी किटली तूनच बाहेर कपात पडतात;
आणि
काही काही चहा तर
आल, पुदिना मसाल्याचे दागिने घालून,
एका मुलीच्या अभ्यासा साठी,
एका आईच्या मनातूनच बाहेर पडतात ...
पडदा उघडतो, वाफा काचा झाकावतात,
सगळे नट नट्या, जांभया देत घरी निघतात
उरते फक्त
एक अभ्यासू मुलगी, एक आई ,
आणि प्रेमाने वाफाळलेला चहा ...
- सुरंगा दाते